प्रतिनिधी /बेळगाव
जुन्या सदाबहार चित्रपटगीतांना आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी पहिल्या फेरीपासूनच ही स्पर्धा रंगतदार झाली आहे. रविवार दि. 26 रोजी या पर्वाच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात होणार आहे. सकाळी 10.30 वा. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे ही उपांत्यपूर्व फेरी होणार आहे.
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी प्रस्तूत व रसिक रंजन आयोजित ‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम’ स्पर्धेची रंगत उपांत्यपूर्व फेरीत अधिकच वाढणार आहे. यावेळी 8 संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी निवडले गेले आहेत. हे स्पर्धक आता आपली गीते सादर करणार असून त्यातील उत्कृष्ट गायकांना पुढील फेरीसाठी निवडले जाणार आहे.
श्रोत्यांसाठी असणार पर्वणी
सत्तरच्या दशकातील अजरामर गीते कराओकेच्या माध्यमातून ऐकण्याची पर्वणी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे. रोमॅंटिक सॉंग, गजल, कॉमेडी सॉंग, नामांकित संगीतकारांची गीते एकेरी व दुहेरी ऐकता येणार आहेत. संघ मारवा- शंकर जयकिशन किंवा एस. डी. बर्मन, कल्याण- ओ. पी. नय्यर किंवा हेमंत कुमार, बसंत- सी. रामचंद्र किंवा रोशन, केदार- सलिल चौधरी किंवा सी. रामचंद्र, भूपाळी- हेमंत कुमार किंवा रोशन, जोग- नौशाद किंवा मदन मोहन, शिवरांनजनी- मदन मोहन किंवा एस. डी. बर्मन, आसावरी- ओ. पी. नय्यर किंवा सलील चौधरी यांची गीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी तरुण भारत मीडिया पार्टनर तर हॉस्पिटॅलिटी हॉटेल समुद्र असणार आहे. कोरोनामुळे प्रत्येकालाच प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रम पाहणे शक्मय नसल्याने अशा रसिकांसाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तरुण भारतच्या ‘तरुण भारत न्यूज, बेळगाव’ या फेसबुक पेजवरून तसेच ‘तरुण भारत न्यूज’ या यूटय़ूब चॅनेलवरून लाईव्ह कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.