8.39 टक्क्यांपर्यंत घसरण ः 18 महिन्यांनंतर प्रथमच ‘सिंगल डिजिट’मध्ये
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाई दरात घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, घाऊक किंमत-आधारित महागाई दर (डब्ल्यूपीआय) 8.39 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यापूर्वी तो सप्टेंबरमध्ये 10.70 टक्के, ऑगस्टमध्ये 12.41 टक्के आणि जुलैमध्ये 13.93 टक्के होता. गेल्यावषी ऑक्टोबर 2021 मध्ये हा दर 13.83 टक्के होता.
मागील काही महिन्यांपासून महागाईचा सामना करणाऱया भारतीयांना आणि केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 8.39 टक्क्मयांवर आला आहे. सलग 18 महिने घाऊक महागाईचा दर हा दोन आकडय़ांमध्ये होता. त्यानंतर आता 19 व्या महिन्यात हा आकडा 10 टक्क्मयांहून कमी झाला आहे. खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्याने घाऊक महागाई दरात घट झाल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर महिन्यात 8.08 टक्के असलेला खाद्य महागाई दर ऑक्टोबरमध्ये 6.48 टक्क्मयांवर आला आहे. ऑगस्ट महिन्यात हा दर 9.93 टक्क्मयांवर होता. तसेच भाज्यांची महागाई 39.66 टक्क्मयांवरून 17.61 टक्क्मयांपर्यंत आली आहे. अंडी, मांस आणि मासे यांची चलनवाढ 3.63 टक्क्यांवरून 3.97 टक्के झाली आहे.
घाऊक महागाईच्या दरांतर्गंत विविध वस्तूंच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टचा महागाई दर कमी होऊन 4.42 टक्क्मयांवर आला. मागील महिन्यात हा दर 6.34 टक्के इतका होता. त्याशिवाय तेल आणि ऊर्जा क्षेत्रामधील महागाईचा दर 23.17 टक्क्मयांवर आला. त्याआधी हा महागाई दर 32.61 टक्के इतका होता. इंधन-तेल आणि ऊर्जा निर्देशांकांमध्ये एलपीजी, पेट्रोलियम आणि डिझेल सारख्या वस्तूंचा समावेश आहे.
घाऊक महागाईत दीर्घकाळ होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. याचा सर्वाधिक परिणाम उत्पादक क्षेत्रावर होतो. भारतात दोन प्रकारची महागाई आहे. एक म्हणजे किरकोळ आणि दुसरी घाऊक महागाई ही होय. दोन्ही प्रकारची महागाई मोजण्यासाठी वेगवेगळय़ा वस्तूंचा समावेश केला जातो. किरकोळ चलनवाढीचा दर सामान्य ग्राहकांनी देऊ केलेल्या किमतींवर आधारित असतो. त्याला ग्राहक किंमत निर्देशांक असे संबोधले जाते.