प्रतिनिधी/ मडगांव
बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. चर्चिल आलेमाव हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चर्चिल आलेमांव यांनी अद्याप आपण भविष्यातील राजकीय योजना ठरवल्या नसल्याचे सांगितले आहे. चर्चिल आलेमांव यांनी आजवर युगोडेपा, काँग्रेस, सेव्ह गोवा फ्रंट, राष्ट्रवादी काँग्रेस व तृणमूल काँग्रेस असा राजकीय प्रवास केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत त्यांची प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.
तृणमूल काँग्रेससोबत जाणे ही मोठी चूक : चर्चिल
गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. त्याची कन्या वालंका आलेमांव यांनीही तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. पण, दाऊण पराभवानंतर चर्चिल आलेमाव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तृणमूल काँग्रेसमध्ये जाणे ही आपली मोठी चूक होती, असे मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले होते.