सध्या ऑर्गेंजा फॅब्रिकची बरीच चलती आहे. वजनाला अत्यंत हलक्या असणार्या या फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेले भारतीय पारंपरिक पेहराव कोणत्याही समारंभाची शान ठरतात. या फॅब्रिकपासून साडय़ा, लहंगे, अनारकली तसंच दुपट्टेही तयार केले जातात. कापडाचा हा प्रकार खूप आकर्षक वाटतो. ऑर्गेंजा हे सिल्कच्या धाग्यांपासून तयार करण्यात आलेलं फॅब्रिक आहे. मात्र नायलॉन आणि पॉलिस्टरच्या धाग्यांच्या मिश्रणानेही ऑर्गेंजा फॅब्रिक तयार केलं जातं. ऑर्गेंजा कापड खूप मुलायम असतं. यामुळेच या कापडापासून तयार करण्यात आलेले कपडे खूप आरामदायी वाटतात. ऑर्गेंजा फॅब्रिकची साडी तुम्ही अधिक विश्वासाने कॅरी करू शकता. अत्यंत हलकी अशी ही साडी खूप सुंदर दिसते. लग्न, पार्टीसह कोणत्याही कार्यक्रमात ऑर्गेंजा फॅब्रिकची साडी नेसता येईल. ऑर्गेंजा कापड विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. विविध रंगांच्या आणि डिझाइन्सच्या ऑर्गेंजा साडय़ा बाजारात उपलब्ध आहेत. या फॅब्रिकवर फ्लोरल प्रिंट्स अधिक खुलून दिसतात. हे फॅब्रिक विकत घेऊन तुम्ही तुमच्या आवडीचं डिझाइन कस्टमाईज करून घेऊ शकता. जरी बॉर्डरवाली ऑर्गेंजा साडी तुमचा लूक खुलवू शकते. लग्न समारंभासाठी काही खरेदी करणार असाल तर ऑर्गेंजा मटेरियलच्या पेहरावांचा विचार करायला हरकत नाही. हे कापड पारदर्शक असतं. त्यामुळे त्याच्या साडय़ा स्टायलिश ब्लाउजसोबत कॅरी करा. या फॅब्रिकवर खूप जड आणि मोठय़ा आकाराचे दागिने घालू नका. त्याऐवजी चोकर किंवा नाजूकसं नेकलेस घाला. या साडीसोबत रफल्ड परकर घाला. या साडय़ांवर सौम्य मेक अप छान दिसतो.
Trending
- पनवेल जवळ मालगाडीला अपघात झाल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
- रायगड किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेमध्ये सापडल्या चरस पिशव्या
- भर पावसात ‘स्वच्छता ही सेवा..1 तारीख 1 तास’
- रत्नागिरी सिंधुदुर्गला वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा
- स्क्वॅशमध्ये भारताचे ऐतिहासिक यश
- रिंगरोडप्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा
- राज्यात परतीच्या पावसाचा कहर
- भारतीय हॉकी संघाचा पाकवर विक्रमी विजय