वारणानगर / प्रतिनिधी:
वारणा नदी पात्रात पाणी पुरवठा होणाऱ्या वसंत सागर या चांदोली येथील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणात ढगफुटी सारखा पाऊस पडत आहे त्यामुळे धरणाच्या वक्र दरवाज्यातुन एकुण २२००० हजार क्युसेक्श इतका वीसर्ग नदीपात्रात रात्री ८ वा. सुरु केल्याची माहिती सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यानी देवून नदी काठच्या गांवाना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे सांगीतले.
सोडण्यात येणार आहे.
पाऊसाला सुरवात झाले पासून चांदोली धरण क्षेत्रात दि. १ जून ते आज अखेर १०९३ मि. मी. पाऊस पडला असून गेल्या ३५ तासात सुमारे २५० मि.मी. वर पाऊस पडला आहे यामूळे ३४.४० टी.एम.सी. क्षमता असलेल्या वसंत सागर या चांदोली धरणात २९.६१ टी.एम.सी. पाणी साठा होऊन धरण ८६ टक्यावर भरले होते कदाचीत आज गुरुवारी पडलेल्या ढगफुटी सारख्या पाऊसाने धरण पूर्णपणे भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाऊसाला सुरवात झाले पासून चांदोली धरणातून वीज निर्मीती व इतर मार्गाने ७०० क्युसेक्श पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता आज गुरूवारी सायकाळ पर्यन्त तो ६००० क्युसेक्श होता परंतु दुपारपासुन पुढे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सारखा पडत असलेला पाऊस त्यामुळे धरणात झपाट्याने पाण्याची पातळी वाढल्याने प्रथमच २२ हजार क्युसेक्श पाखाचा विसर्ग पात्रात सुरू करण्यात आला असून वारणा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी गतीने वाढणार आहे त्यामूळे नदी काठच्या सर्वच तरी या बाबत नदी काठच्या गांवातील ग्रामस्थांना धोक्याचा ईशारा देणेत आल्याचे सहा अभियंता किटवाडकर यानी सांगीतले.