वृत्तसंस्था/नवी दिल्ली :
ऍडव्हेंचर दुचाकीधारकांसाठी 2020 हे विशेष राहणार आहे. कारण चालू वर्षात भारतीय बाजारात अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत राहिलेल्या पाच ऍव्हेंचर दुचाकींचे सादरीकरण होणार आहे. त्यामधील काही विशेष दुचाकीचा तपशील खालीलप्रमाणे.
केटीएम 390 ऍव्हेंचर : केटीएम या ऍडव्हेंचर दुचाकीचे भारातात खुप दिवसांपासून प्रतिक्षा केली जात आहे. या दुचाकीमध्ये केटीएम 390 डय़ूकचे ऍडव्हेंचर आवृत्ती आहे. डय़ूक 390 मध्ये 373 सीसी इंजिन, 43 बीएचपी पॉवर आणि 37 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. या दुचाकीचे सादरीकरण जानेवरीत होणार असून अंदाजे 3 लाख रुपये किंमत राहण्याचा अंदाज आहे.
बेनेली टीआरके 251 : बेनेली दुचाकी ऍडव्हेंचर टूर बाईक आहे. यामध्ये 250 सीसी, सिंगल सिलिंडर इंजिन आहे. जे 25.5 बीएचपी पॉवर आणि 21.1 एनएम पीक टॉक जनरेट करणारे आहे. टीआरके 251 दुचाकीला 17 इंचाचे अलॉय व्हील्ज आहे. बेनेलीची किंमत 2 ते 2.5 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे. दुचाकीचे सादरीकरण 2020 च्या पहिल्या तिमाहीत होण्याचे संकेत आहेत.
केटीएम 790 : केटीएमची मोटार सायकल सादर होण्याकडे सर्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मिडलेव्हल ऍडव्हेंचर बाईक्सपैकी एक आहे. कंपनीची नेकेड बाईक 790 डय़ूक वर आधारित आहे. यामध्ये 790 डय़ूकचे 799 सीसी, समांतर इंजिन देण्यात आले आहे. जे 94 बीएचपी पॉवर आणि 88 एनएम टॉर्क जनरेट करत आहे. 10 ते 12 लाख अंदाज किंमत असणारी ही दुचाकी 2020 मधील दुसऱया तिमाहीत भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
ट्रायम्फ टायगर 900 : ट्रायम्फ मोटारसायकल्स आपली ही प्रसिद्ध मध्यम रेंजमधील ऍडव्हेंचर दुचाकीचे लेटेस्ट जनरेशनचे मॉडेल दाखल करण्यात येणार आहे. सदरच्या दुचाकी तीन मॉडेलमध्ये सादर होणार असून बेस, जीटी आणि रॅली मध्ये उपलब्ध होणार आहे. नवीन ट्रायम्फ टायगर 900 मध्ये नवीन 900 सीसी, अन लाइन, 3 सिलिंडर इंजिन आहे. भारतात ही दुचाकी एप्रिल ते मे या कालावधीत सादर होणार असून यांची किंमत 11 ते 13 लाख पर्यंत राहण्याची शक्यता आहे.
होंडा सीआरएफ 1100 एल :होंडा कंपनी आपली लेटेस्ट मॉडेल चालू वर्षात भारतात दाखल करणार आहे. यामध्ये अत्याधुनिक फिचर आणि जादा शक्तीशाली इंजिनची सुविधा देण्यात येणार आहे. ही दुचाकी सीआरएफ 1000 एल आफ्रिका ट्विनच्या बदलल्यात सादर होणार आहे. ऍडव्हेंचर दुचाकीत 1,084 सीसी समांतर इंजिन असणार आहे. होंडाचे दुचाकी 2020 च्या शेवटी सादर होणार असून यांची एक्सशोरुम किंमत 12 ते 13 लाख रुपये राहण्याचे संकेत आहेत.