ऑनलाईन टीम / गडचिरोली :
गडचिरोलीतील जहाल नक्षली आणि कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य सृजनक्का सिनभट्टी जंगलात झालेल्या पोलीस चकमकीत ठार झाली. सृजनक्कावर 144 गंभीर गुन्हे दाखल असून, सरकारने तिच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली पोलिसांचे सी-60 पथक गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत होते. दरम्यान, रविवारी दुपारी त्यांना जंगलात नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याचे दिसले. त्यावेळी पोलीस आणि नक्षलींकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. या चकमकीत जहाल नक्षली सृजनक्का ठार झाली. त्यावेळी इतर नक्षलींनी तिथून पळ काढला. आत्मसमर्पित नक्षलींद्वारे सृजनक्काची ओळख पटवण्यात आली.