प्रतिनिधी/ सातारा
गुरूवारी दुपारी बदली झालेले सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत. ते ग्राउंड लेव्हलपासून काम पाहणारे असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात शुक्रवारी लगबग दिसतं होती. कोरोनाला अटकाव करण्यासाठी ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गौडा यांनी अनेक महत्वाचे बदल केले आहेत. कोरोना काळात सकारात्मक उद्देश घेऊन नागरिकांच्या हितासाठी कोरोना केअर सेंटर सुरू केले. कोरोनाला काही प्रमाणात आळा ही घालता आला. आता त्यांची बदली सातारा जिल्हा परिषदेत झाली आहे. विनय गौडा यांनी तिथला पदभार सोडला असून येथील पदभार ते सोमवारी स्वीकारणार आहेत. ते अतिशय शिस्तबद्ध तरुण अधिकारी आहेत.त्यामुळे सोमवारी त्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषदेत तयारी करण्यात आली असल्याचे समजते. मात्र, ते कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामीण भागात नेमक्या काय उपाय योजना करणार आहेत, आरोग्य विभागाला चार्ज करण्यासाठी ते काय करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.