प्रतिनिधी/ सातारा
राज्य पोलीस दलात मंगळवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांचे प्रमोशन झाले असून त्यामध्ये सातारा जिह्यातील 8 पोलीस अधिकाऱयांचा समावेश आहे. दरम्यान, 8 पोलीस अधिकारी बदलून जाणार असल्याने त्यांच्या जागी नवे तसेच जुन्यातील कोणत्या पोलीस अधिकाऱयांना पोलीस ठाणी मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कदम यांची नवी मुंबई व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांची मिरा भाईंदर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांची औरंगाबाद, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची पुणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी जाधव यांची ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांची मुंबई शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांची मुंबई शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत नागटिळक यांची मुंबई शहर या सर्व पोलिस अधिकाऱयांची पदोन्नतीने बदली झाली आहे.
यातील गजानन कदम हे पोलीस अधीक्षक यांचे वाचक (रिडर) आहेत. तसेच सपोनि संतोष चौधरी हे लोणंद पोलीस ठाण्याचे कारभारी आहेत. यापूर्वी त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्याचा चार्ज संभाळला होता. त्यांची दोन्ही ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे.
दरम्यान, आता रिक्त होणाऱया जागांवर जिह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून फिल्डींग लावली जाणार आहे. यामुळे कोणाची कुठे बदली होणार याचीही उत्सुकता पोलीस दलात आहे.