5 मृत्यू , 172 बरे होऊन परतले घरी, पॉ†िझटिव्हीटी रेट 2.63
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये गुरूवारी कोरोनाचे 67 नवे रूग्ण आढळले आहेत़ 172 बरे झालेल्या रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े जिह्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आह़े मात्र कोरोनाच्या चाचण्यांमध्ये देखील घट झाल्याने कोरोनाचा जिह्याला असलेला धोका कायम असल्याचे म्हटले जात आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार रविवारी कोरोनाच्या केवळ 2 हजार 989 चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 1 हजार 28 चाचण्यांपैकी 27 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 961 पैकी 40 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड 3, दापोली 8, खेड 4, गुहागर 7, चिपळूण 18, संगमेश्वर 5, रत्नागिरी 14, लांजा 1 तर राजापूर 7 असे तालुकानिहाय रूग्ण सापडले आहेत़ यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 77 हजार 384 झाली आह़े आरटीपीसीआर चाचणीनुसार जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.63 झाला आह़े
रविवारी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये खेड, संगमेश्वर व रत्नागिरी प्रत्येकी 1 व चिपळूण 2 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े मागील 24 तासात बरे झालेल्या 172 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 74 हजार 79 व प्रमाण 95.83 झाले आह़े सद्यस्थितीत 757 रूग्ण उपचारात दाखल असून यामध्ये केवळ 346 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़