म्हैसूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार एन. निरंजन निकम यांचे बुधवारी म्हैसूरमध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले.
निरंजन निकम यांनी ‘विजय टाइम्स’, ‘डेक्कन हेराल्ड’ आणि ‘स्टार ऑफ म्हैसूर’ वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम केले आहे.
निरंजन निकम यांच्या निधनाबद्दल कर्नाटक पत्रकार बंधूंनी शोक व्यक्त केला आहे.