ऑनलाईन टीम / मुंबई :
1947 साली भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं असं वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिचावर सर्व स्तरातून टीका होत आहे. तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी जोर धरत आहे. असे असतानाच कंगनाने इंन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे. 1947 मध्ये नेमकं काय घडलं? हे कोणी मला सांगितल्यास मी पद्मश्री पुरस्कार परत करेन, असे कंगनाने म्हटले आहे.
कंगनाने म्हटले आहे की, 1857 मध्ये स्वातंत्र्यासाठी पहिला संघटित संघर्ष झाला. सोबत सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकरांनी बलिदानावरही भाष्य केलं. 1987 बद्दल मला माहीत आहे. पण 1947 मध्ये कोणता लढा देण्यात आला त्याची मला माहिती नाही. जर कोणी माझ्या माहितीत भर घातली, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन. कृपया माझी मदत करा,’ असं कंगनानं म्हटलं आहे.