प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ४ गावात ७ रुग्ण सापडले आहेत. तर तासगाव शहरात सलग पाचव्या दिवशीही शुन्य रूग्ण असे दिलासादायक चित्र पाहवयास मिळाले आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत १८४ दिवसात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३१४३ झाली आहे. तालुक्यात बुधवारी मणेराजुरी – ३, पेड – २ तसेच पाडळी, सावळज येथे प्रत्येकी एक असे एकूण ७ रूग्ण सापडले आहेत.
तालुक्यात गेल्या 30 दिवसांपासून रूग्णसंख्या कमी होत आहे. तर गेल्या पाच दिवसात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या पाच दिवसात एक ही रूग्ण सापडलेला नाही.
Add A Comment