प्रतिनिधी /बेळगाव
सुळगा (हिं.) येथील रहिवासी बांधकाम कामगार शांता उचगावकर यांचे नुकतेच आजाराने निधन झाले. ग्राम पंचायत ऑपरेटर बसवराज पुजारी (हिरेमठ) यांनी त्यांच्या कुटुंबाला भेट दिली. दरम्यान कामगार खात्याकडून साहाय्य धन मिळवून देण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते शांता उचगावकर यांच्या कुटुंबीयाकडे साहाय्य धन आदेशाची प्रत सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱयांनी नागरिकांना सरकारमार्फत असलेल्या सेवा-सुविधा त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविण्याचे काम ग्राम पंचायतीच्या ऑपरेटर्संनी करावे, असे आवाहन केले.