ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 13,287 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 300 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना संक्रमणाचा दर वाढून 17.03% इतका झाला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 13,61,986 वर पोहोचली आहे.
त्यातच मागील 24 तासात 14,071 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 12 लाख 58 हजार 951 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 20,310 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 82 हजार 725 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 80 लाख 27 हजार 606 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 63,615 आरटीपीसीआर टेस्ट आणि 14,720 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 56,852 झोन आणि 816 कंट्रोल रूम आहे.