ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 47 हजार 262 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 275 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 17 लाख 34 हजार 058 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 60 हजार 441 एवढी आहे.
मंगळवारी 23,907 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 05 हजार 160 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 3 लाख 68 हजार 457 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 5 कोटी 08 लाख 41 हजार 286 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 23 कोटी 64 लाख 38 हजार 861 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 25 हजार 628 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.23) करण्यात आल्या.