वार्ताहर/ उचगाव
बेळगाव-वेंगुर्ला या मार्गावरील सुळगा गावाजवळील मारुती मंदिराशेजारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चेतन भरमा म्हेत्री याचा उपचारासाठी बेळगाव जिल्हा हॉस्पिटलकडे नेत असताना मृत्यू झाला. तर जखमी नारायण लक्ष्मण राक्षे हाही गंभीर जखमी असून त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चेतन म्हेत्री हे आपल्या स्प्लेंडर या दुचाकी वाहनावरून उचगावकडे निघाले होते तर नारायण राक्षे हे आपल्या टीव्हीएस या दुचाकीवरून कल्लेहोळ गावाकडे निघाले असताना हा अपघात घडला.
चेतन म्हेत्री यांच्या कुटुंबीयांनी व दलित नेत्यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला असून वरि÷ पोलीस अधिकाऱयांची भेट घेऊन या अपघाताची संपूर्ण चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडे केल्याचे समजते.