मुंबई /प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या मकेंद्री अंत्रीमंडळाचा विस्तार अखेर बुधवारी झाला. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामंत्रिमंडळात काही जुन्या मंत्र्यांना हटवून मोठ्यासंख्येने नव्या चेहऱ्यांना पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे. तसेच, नव्या मंत्र्यांचे खातेवाटपही झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसच्यवतीने गुरुवारी पेट्रोल, डिझेल, घरगुती स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध नोंदवला गेला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर एक विधान केलं. “मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही. तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे” असं ते म्हणाले होते.
दरम्यान, नाना पटोलेंच्या या विधानावर आज, शुक्रवारी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे. त्यांनी “ गेल्या २५ वर्षात गांधी घराण्याच्या बाहेरील नेत्यास पक्षाध्यक्ष नेमू न शकलेल्या काँग्रेसने प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या मोदींबाबत न बोललेले बरे. तसेच मोदी सोनिया मातोश्रींच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत.” असं भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल आहे.