बेंगळूर : ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनी टोयोटाने आपल्या नव्या सुधारीत इनोव्हा क्रिस्टा या गाडीचे बाजारात नुकतेच लाँचिंग केले आहे. या गाडीची किंमत अंदाजे 16 लाखापासून 24 लाखापर्यंतच्या आसपास असणार असल्याचे समजते. अनेकविध वैशिष्टय़े यात असतील. ही गाडी सुरूवातीला 2005 मध्ये दाखल करण्यात आली होती. कंपनीने आजवर 8 लाखाहून अधिक गाडय़ा विक्री केल्या आहेत. त्यानंतर 2016 मध्ये दुसरी आवृत्ती सादर करण्यात आली होती. आताच्या नव्या सुधारीत आवृत्तीच्या वाहनात अनेक वैशिष्टय़े असतील. बाहय़भागातही सुधारणा करण्यात आल्या असून बहुपर्यायी (मल्टीपर्पजव्हेईकल) गटात इनोव्हा क्रिस्टाचा बाजारातील वाटा 43 टक्के इतका आहे.
Previous Articleबायोकॉन हिंदुजामध्ये वाटा घेणार
Next Article टाटा मोटर्सची ‘इंडिया की दुसरी दिवाली’ मोहिम
Related Posts
Add A Comment