ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या विनयच्या वकिलाने न्यायालयात दावा केला आहे की, विनय याला तिहार तुरूंगात विष देण्यात आले होते.
विनयच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान वकील ए.पी. सिंह म्हणाले की, त्यांच्या क्लायंटला विषबाध झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण वैद्यकीय अहवाल देण्यात आला नाही. मात्र, प्रशासनाने त्यांचा आरोप खोटा ठरविला आहे.
त्याचवेळी एपी सिंह यांनी याचिकेत असेही म्हटले आहे की, तिहार जेल प्रशासनाने अद्याप दोषी पवन, अक्षय आणि विनय यांची कागदपत्रे दिली नाहीत. म्हणूनच, राष्ट्रपतींकडे क्मयूरेटिव्ह याचिका आणि दया याचिका पाठविण्यास विलंब होत आहे.
सिंग यांनी पतियाळा हाऊस कोर्टासमोर दाखल केलेल्या याचिकेत विनय शर्माच्या दया याचिका आणि विनय शर्मा, पवन कुमार गुप्ता आणि अक्षय कुमार सिंग यांच्या कागदपत्रांची विनंती करण्याबाबत तातडीने कोर्टाचे आदेश मागितले आहेत.