विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला असून त्यासाठी ाdनपक्षाची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आगामी 10 दिवस कोणतेही आंदोलन पक्षातर्फे करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या वरीष्ठ पातळीवरून तसे निर्देश आले असून अनेक गटसमित्यांची पुनर्रचना केली जाणार आहे तर सक्रिय कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत बढती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी एक ते दीड वर्षे बाकी असून नवीन चेहऱयांना उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर आहे. जे प्नाक्षातून फुटले त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही आणि उमेदवारी देखील दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
इंटरने सुविधेसाठी प्रत्येक पंचायतीला ब्रॉडबँड ऑप्टीकल फायबरची जोडणी देण्यात आली असून त्याद्वारे गावागावात इंटरनेट जोडणी मोफत देता येणे शक्य आहे म्हणून त्या पर्यायाचा वापर करण्यात यावा. त्यामुळे मोबाईल टॉवरचा प्रश्न येणार नाही, असे श्री. कामत यांनी सूचित केले. पंचायतींमधून त्या क्षेत्रातील घरांना इंटरनेट जोडणी देता येऊ शकते, असेही आमदार कामत यांनी निदर्शनास आणून दिले.
आपण अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला असता तरी आता भाजप सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी काम करणार असून जनतेमध्ये असंतोष भडकलेला आहे. जनताच आता भाजपला धडा शिकवणार असून त्यासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षाला सरकार्य करावे, असे आवाहन श्री. चोडणकर यांनी केले. राजभवन प्रकरणी भाजपच्या अध्यक्षांनी खुलासा केला म्हणून श्री. चोडणकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. तानावडे हे भाजपचे अध्यक्ष आहेत, सरकारचे प्रवक्ते नाहीत. राजभवन स्वतःची मालमत्ता असल्याच्या थाटात त्यांनी बोलू नये. मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा व तानावडे जे पुरावे मागतात ते त्यांना राज्यपालांच्या पत्रात मिळतील, असेही श्री. चोडणकर म्हणाले.