सांगलीत औरंगाबाद अत्याचार प्रकरणी आंदोलन
प्रतिनिधी / सांगली
एका उच्चशिक्षित तरूणीला नोकरीचे प्रलोभन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याची नैतिक जबाबदारी स्विकारत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपमहापौर तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी केली आहे. या घटनेचा निषेध म्हणून सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत तीव्र निदर्शने करण्यात आली.
महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संघटन सरचिटणीस दिपक माने, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस किरण भोसले, सरचिटणीस अदित्य पटवर्धन, प्रथमेश वैद्य, ज्योती कांबळे, चेतन माडगूळकर, उपाध्यक्ष नगरसेवक निरंजन आवटी उपस्थित होते.