असनिये जंगल नजिकची घटना
ओटवणे / प्रतिनिधी:
असनिये येथील जंगल नजिक चरत असलेल्या गाभण म्हशीवर बुधवारी पट्टेरी वाघाने हल्ला करीत ठार केले आणि तिचा फडशा पाडला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
असनिये गावठणवाडी येथील विश्वनाथ गोपाळ सावंत यांची गुरे बुधवारी जंगलाच्या नजिक सोलीयाचे भरड या ठिकाणी चरत होती. बुधवारी सायंकाळी इतर गुरांसोबत ही म्हैस गोठ्यात न आल्यामुळे सावंत यांनी शोधाशोध केली असता घटनास्थळी ही मृत म्हैस पाहून सावंत यांना धक्काच बसला. या घटनेत त्यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक श्री गोजरे, वनमजूर आत्माराम सावंत आदींनी तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. दरम्यान या म्हशीचा फडशा पाडलेला बिबट्या नसून तो पट्टेरी वाघच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Previous Article18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्र
Next Article कमलनाथ सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत रवाना
Related Posts
Add A Comment