बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक: राज्यात पोटनिवडणूक असल्याने आचारसंहितेचा हवाला देत मंत्र्यांनी वेतन वाढीसंदर्भात परिवहन कर्मचाऱ्यांना ४ मे पर्यंत थांबायला सांगितले आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि परिवनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी राज्यात पोटनिवडणूक असून राज्यात आचारसंहिता असल्याचे नमूद केले. उपमुख्यमंत्री सवदी यांनी ७ एप्रिलपासून करण्यात येणार बेमुदत संप थांबवावा अशी विनंती केली. पोटनिवडणूक आणि आचारसंहिता यामुळे वेतनात फेरबदल करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला अडथळा असल्याचे म्हंटले आहे.
अनिश्चित काळाच्या संपामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होईल असा पुनरुच्चार करीत सवदी यांनी, बिदर, रायचूर आणि बेळगाव येथे आगामी पोटनिवडणुकांसाठी आचारसंहिता आधीपासूनच अस्तित्त्वात असल्याने सरकार वेतन पुनरावृत्तीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यास असमर्थ आहे. निवडणूक आयोगाकडून (ईसी) आधी परवानगी मागणे अनिवार्य आहे आणि या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे यापूर्वी संपर्क साधला आहे. ” असे ते म्हणाले.