पाचगाव/प्रतिनिधी
पाचगाव आर.के. नगर रस्त्यावरील हरी पार्क येथील एका नातेवाईकाच्या महिलेचा गूरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. ही महिला राजाराम चौक टिंबर मार्केट परिसरातराहत होती. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने हरी पार्क परिसर निर्जंतुकीकरण करून घेतला आहे.
पाचगाव हरी पार्क येथील नातेवाईक टिंबर मार्केट परिसरात येत होता. या महिलेच्या संपर्कात हा नातेवाईक आला आहे. गूरूवारी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीसाठी हरी पार्क परिसरातील काही नागरिक गेल्याचे समजते. हा व्यक्ती नेहमी टिंबर मार्केट परिसरात येत होता. त्याच्या संपर्कात परिसरातील अनेक नागरिक होते. या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आर.के.नगर येथील हायस्कूल मध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाचगाव मधील नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, नियमांचे पालन करावे असे आवाहन पाचगाव चे सरपंच संग्राम पाटील यांनी केली आहे.