मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सव अवघ्या 25 दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पी ओ पी वर निर्बंध घातले आहेत. ते तातडीने मागे घ्यावे आणि गणेश भक्तांना गणेशोत्सव शांततेने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. अशी मागणी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ शहापूर विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पीओपी मूर्ती बरोबरच गणेश विसर्जन कुंड स्वच्छ करावे. जकीनहोंडा, नागर कॅम्प, कल्पेश्वर तलाव, कपिलेश्वर तलाव, किल्ला तलाव अशा ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. प्रदूषण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. हेस्कॉम मार्फत देण्यात येणारे वीज पुरवठ्यासाठी जे डिपॉझिट घेतले जाते ते कमी करावे. यासह इतर समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंदप, सेक्रेटरी राजू सुतार, खजिनदार मंगेश नगोचिये, रावबहादूर कदम, नगरसेवक रवी साळुंखे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleलोंढा ते वास्को रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी कोसळली दरड
Next Article कात्रजमध्ये एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने-सामने?
Related Posts
Add A Comment