प्रतिनिधी / खानापूर
कोरोनाच्या महामारीमुळे जनता वैतागली असताना सरकारने देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्याचे जगणे मुश्किल झाले आहे. सध्या देशभरात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली तर घरगुती स्वयंपाक गॅस 900 रुपयांपर्यंत गेल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. याचा निषेध करण्यासाठी खानापूर तालुका काँग्रेसच्यावतीने विविध ठिकाणी निदर्शने सुरू करण्यात आली आहेत. सोमवारी खानापूर शहरातील विविध पेट्रोल पंपांवर निदर्शने करून दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा सत्ता सोडावी, अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. तर मंगळवारी तालुक्यातील जांबोटी व बिडी येथे एकाचवेळी पेट्रोल, डिझेल दरवाढीविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला.
जांबोटी येथे झालेल्या निदर्शनात महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा अनिता दंडगल, दुर्गेश तळवार, उपेंद्र नाईक, संजय गावडे, नामदेव गुरव, तानाजी गुरव, लुमाण्णा गुरव, सखुबाई पाटील व यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. तर याचवेळी बिडी येथेही निदर्शने करून केंद शासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या निदर्शने आंदोलनात खानापूर ग्रामीण ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मधूकर कवळेकर, बिडी. ग्रा. पं. चे सदस्य फ्रान्सीस तसेच इसाक तिगडी, महावीर हुलकवी, अन्वर बागवान यासह बिडी परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले