प्रतिनिधी / वाई
मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने वाई शहरात न येण्याच्या अटीवर जामीन दिलेल्या गुन्हेगार भाऊराव मेश्राम रा. गंगापूरी वाई हा वाई शहरात आला होता. याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणला असता पोलिसावरच दमदाटी करत त्याने पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या केबिनमध्ये टेबलवर डोके आपटून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्याला रोखले अन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की भा.द.वि.स.क, 307, 326, 323, 501, 504, 34 मध्ये जिल्हा सत्र न्यायालय सातारा यांनी वाई शहरात येणेस मनाई आदेश करुन जामिन मंजूर केलेला आरोपी सागर भाऊराव मेश्राम (रा. गंगापूरी वाई ता. वाई जि. सातारा हा वाईमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.वाई पोलीस ठाण्याचे डीबीचे जवान श्रावण राठोड व होमगार्ड होमगाई प्रणित येवले यांना गस्त घालत असताना दुपारी 12. 00 तो दिसला.
त्यावरून सागरला त्यांनी विचारले असता तो त्यांच्यावरच दादागिरी करू लागला. तुम्हाला काय कराचेय कोर्ट व मी बघून घेईन’ असे म्हणू लागला. त्यावरून त्याला वाई पोलीस ठाण्यात आणला. पोलीस निरीक्षक खोबरे यांच्या केबिनमध्ये त्यास विचारपूस करण्यास हजर केले असता त्याने गोंधळ घालत स्वतःचे डोके टेबलावर आपटले. त्याने अचानक घेतलेल्या पवित्र्याने सगळ्यांची पळापळ झाली. तेथेच असलेल्या पोलिसांनी पकडले. त्याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस तपास करत आहेत.