बेळगाव / प्रतिनिधी
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे शुक्रवार दि. 31 व 1 फ्रेब्रुवारी विविध मागण्यांकरिता बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. शुक्रवार दि. 31 रोजी सकाळी 10.30 वा. शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, सिंडीकेट बँक मारूती गल्ली येथे रॅलीची सांगता होणार आहे.
20 टक्के पगार वाढ, 5 दिवसांचा आठवडा, विविध भत्ते, पेन्शनमध्ये वाढ यासह विविध 12 मागण्यांसाठी हे कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. यामध्ये बेळगावमधील विविध बॅंकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.
सलग बँका बंद राहिल्याने व्यवहारावर होणार परिणाम
शुक्रवार व शनिवार संपामुळे बँका बंद राहणार आहेत. तर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सलग तीन दिवस सुट्टी होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम व्यवसायांवर होणार आहे. सलग बँका बंद राहणार असल्यामुळे ग्राहकांना गुरूवारपर्यंत आपली आर्थिक कामे करावी लागणार आहेत.