नवी दिल्ली : सरकारी क्षेत्रातील प्रमुख बँकेमधील एक असणारी बँक ऑफ इंडिया 8 हजार कोटी रुपयाची उभारणी करण्याची योजना आखत आहे. बँकेच्या समभागधारकांनी फंड जमा करण्यासाठी सदर योजनेला मंजुरी दिलेली आहे. अशी माहिती बँकेकडून रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिली आहे. शनिवारी बँक ऑफ इंडियाच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत समभागधारकांना फंड उभारण्याच्या योजना हिरवा कंदील दिला आहे. सदरचे भांडवल हे इक्विटी समभाग, टियर 1, टियर 2 बॉण्ड किंवा अन्य पद्धतीने हा निधी जमा करणार असल्याचे बँकेने सांगितले आहे. तसेच इक्विटी समभाग सवलत किंवा बाजार भावाप्रमाणे प्रीमियमसोबत सवलत मिळण्याची शक्मयता आहे. बॅलेन्सशिटच्या आधारे 31 मार्च 2020 पर्यंत बँक ऑफ इंडियाचा एकूण तोटा हा 23.782.39 कोटी रुपये राहिलेला आहे. ईजीएमध्ये हा तोटा समभाग प्रीमियम खात्यामधून भरपाई करण्यास मंजुरी दिलेली आहे. ऑगस्टमध्ये बँक ऑफ इंडियाने सांगितले होते, की भारताची बँकिंग सिस्टममध्ये 2013 पासून बेसिल 3 ची मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांना वेगवेगळय़ा टप्प्यावर लागू करण्यात येत आहे.
Previous Articleआणखी 77 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
Next Article कोरोना संसर्गानंतर ‘ऑनलाईन’कडे वाढता ओढा
Related Posts
Add A Comment