वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने चार वर्षापूर्वी नोटबंदी लागू केली होती. सदर निर्णयातून बनावट नोटांची समस्या नष्ट करण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. सदर कालावधीत सरकारने 500 रुपये आणि 1000 रुपयांची नोटबंदी केली होती. यातून 2000 रुपयांची नोट चलनात आणली होती. परंतु मागील वर्षात जितक्मया बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. यामध्ये 2000 रुपयाच्या नोटेचा समावेश सर्वाधिक राहिल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या(एनसीआरबी) वार्षिक अहवालात समोर आली आहे.
सदर आकडय़ासह 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये बनावट नोटांची प्रकरणे शोधण्यात तेजी आल्यानंतर एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये देशात 25.39 कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. हाच आकडा 2018 मध्ये 17.95 कोटींवर राहिल्याचीही नोंद केली आहे.
मागील वर्षात 100 रुपयाच्या 71,817 बनावट नोटा पकडल्या आहेत. यामध्ये दिल्लीत सर्वाधिक 31,671 नोटा, गुजरात 16,159 आणि उत्तर प्रदेशात 6,129 नोटा पकडल्याची माहिती आहे.