बेंगळूर/प्रतिनिधी
सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई केली आहे. सईबी पोलिसांना माहिती मिळाल्यांनतर घटना स्थळी पोहचत कारवाई करत आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. बुधवारी सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर लावलेल्या सट्टेबाजीमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली सहा जणांना अटक केली आहे.
सीसीबी पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून सहा लाखांची रोकड आणि सहा मोबाइल फोन जप्त केले आहेत.
याविषयी माहिती देताना गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सध्या चालू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामान्यांवर सट्टेबाजी केल्याच्या आरोपावरून बनसवाडी आणि मल्लेस्वरम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.