बेंगळूर/प्रतिनिधी
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना आता विमानतळावर कोरोना चाचणी करता येणार असून काही मिनिटांत चाचणी निकालही मिळणार आहे. बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (बायल) ने मंगळवारी कोरोना चाचणी सुविधा सुरू केली असून ती चोवीस तास उपलब्ध आहे. चाचणीसाठी आरटी-पीसीआर पद्धतीचा वापर करुन प्रवाशाला अवघ्या १३ मिनिटांत अहवालही मिळणार आहे.
बीआयएएलच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार शहरात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांना या सुविधेसाठी विशेष मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. विमान उड्डाण करण्यापूर्वी प्रवासी तपासणी करण्यास सक्षम असतील.
टर्मिनलच्या आगमनाजवळ तपासणी केंद्र सुरू केले आहे जे बेंगळूरस्थित औरिगा रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड संचालितद्वारा चालविले जात आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने प्रमाणित केलेली एक अत्याधुनिक प्रयोगशाळा टर्मिनलच्या बाहेरही सुरू केली आहे.