बेळगाव : तांत्रिक बिघाडामुळे एअरक्राफ्ट एका शेतामध्ये इमर्जन्सी लॅन्ड करावे लागल्याची घटना आज सकाळी सांबरा विमानतळानजीक घडली. यात कोणतीहि जीवितहानी झाली नसून पायलट व सहाय्यक सुखरूप आहेत.

आज सकाळी सांबरा एअरफोर्स येथील प्रशिक्षणार्थी एअरक्राफ्टने उड्डान केले होते. या दरम्यान एअरक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाली. त्यामुळे नजीकच्या शेतात लॅन्डींग करण्यात आले. यात कोणतीहि जीवितहानी झाली नसून पायटल व सहाय्यकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान हेएअरक्राफ्ट पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.