ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने AZD1222 ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली असून, दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू आहेत. तरी देखील एस्ट्राजेनेका कंपनीने या लसीचे डोस तयार करण्यास सुरुवात केली आहे.
या लसीच्या मानवी चाचण्या सुरू असताना एस्ट्राजेनेकाने ब्रिटनबाहेर तीन देशांमध्ये लसीचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. भारत, नॉर्वे आणि स्विर्त्झलंड या देशांमध्ये सध्या लस निर्मिती करण्यात येत आहे.
चाचणी सुरू असतानाही लस तयार करणे कंपनीसाठी आर्थिकदृष्ट्या हे धोक्याचे असले तरीही चाचणीचे रिझल्ट सकारात्मक येतील या विश्वासाने कंपनीने तीन देशात लसीचे उत्पादन सुरू केले आहे. लसीचे रिझल्ट नकारात्मक आले तर मात्र, कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. एस्ट्राजेनेका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सॉरिओट यांनी याबाबतची माहिती दिली आहे.