रत्न-समज आणि गैरसमज
रोखठोक सवाल- स्पष्ट, निर्भीड उत्तरे
दि. 12.1.2022 ते 18.1.2022
प्रश्न-माझी रास ‘अमुक’ आहे म्हणून मी ‘तमुक’ भाग्यरत्न वापरू का?
उत्तर- अजिबात नाही. राशीनुसार रत्न घालणे हा मूर्खपणाच नाही, तर घातकसुद्धा आहे. एखाद्याची रास धनू किंवा मीन आहे आणि त्या व्यक्तीला टय़ूमर झाला आहे. त्याने पुष्कराज घातला तर जीवावर बेतू शकते.
प्रश्न-रत्ने काम करतात का, कशी काम करतात?
उत्तर- हो. रत्ने काम करतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू, दगड, माती, पाणी, लाकूड, धातू, अन्नपदार्थ, जीव, वनस्पती इतकेच काय तर रंग, मोबाईल, कॉम्प्युटर.. म्हणजे प्रत्येक वस्तू कुठल्या ना कुठल्या ग्रहाच्या अमलाखाली येते. त्या ग्रहाच्या वैश्विक तरंगांना शोषून घेण्याची ताकत रत्नांमध्ये जास्त असते. म्हणून रवीचे माणिक, चंद्राचे चंद्रकांत/मून स्टोन, मंगळाचे पोवळे, बुधाचा पाचू, गुरुचा पुष्कराज, शुक्राचा हिरा, शनिचा निलम, राहूचा गोमेद आणि केतूचा लसण्या अशी रत्ने वापरतात. म्हणून लक्षात घ्या. रत्ने ग्रहांची असतात, राशीची नाही. आता सोप्या शब्दात रत्ने कशी काम करतात हे सांगतो. समजा डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले की, तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी आहे तर तुम्ही कॅल्शियमच्या गोळय़ा घेता ना? त्याचप्रमाणे एखाद्या ग्रहाचे शुभत्व तुमच्या जन्म कुंडलीमध्ये कमी पडत असेल तर ते वाढवण्याकरता त्या ग्रहाचे रत्न वापरण्यात येते. अशुभत्व कमी करण्यासाठीसुद्धा रत्न वापरता येते पण याची माहिती कमी लोकांना आहे. त्याचप्रमाणे रत्नांचे औषधी गुणधर्मही आहेत. आयुर्वेदामध्ये प्रवाळभस्म, मोतीभस्म वापरतात. उदा. शनिचा निलम खडा कफ प्रवृत्तीच्या लोकांसाठी, अनियंत्रित भुकेच्या समस्यांसाठी वापरण्याची पद्धत काही गंथांमध्ये सांगितलेली आहे.
प्रश्न- बाजारात मिळणारी रत्ने खरी रत्ने असतात का?
उत्तर-बनावट का जमाना है बाबू, जरा बच के! बाजारात मिळणारी 90 टक्के रत्ने ही बनावट असतात. त्यांना सिंथेटिक जेमस्टोन्स, क्रीएटेड जेम्स, हायड्रो अशी विविध नावे आहेत. ‘ऍलम’ नावाच्या रसायनात रंग घालून अगदी पाचूपासून पुष्कराजपर्यंत सगळी रत्ने बनवता येतात. दव काचेमध्ये फायबर आणि रंग घालून सुद्धा बनवतात.
प्रश्न-मग मी कुठले रत्ने वापरू? किती काळ वापरू? कसे वापरू? कुठल्या बोटात वापरू? उपरत्न म्हणजे काय? क्रिस्टल म्हणजे काय? रत्ने कुठल्या धातूत वापरू? रत्ने शुद्धीकरण आणि ऊर्जावान कशी करायची? उत्तर- पुढच्या भागात !!! शुभं भवतू
महाउपाय- ज्यांना राग पटकन येतो, निराशा येते, मन स्थिर रहात नाही, हळवे मन असते, त्यांनी शिवमंदिरात गोल एलईडी बल्बची सोय करावी. (गाभाऱयात)
सोपी वास्तू टीप- पाण्याची जागा, बोअर, विहीर चुकीच्या दिशेला असल्यास त्या जागी दक्षिण-पश्चिम (नैत्य) दिशेला पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा.
मेष
धनागम उत्तम राहील. तब्येतीकडे लक्ष द्या. प्रवास टाळलेले बरे. जमिनीचे व्यवहार पुढे जातील. कलाकारांना उत्तम दिवस. गुंतवणुकीतून फायदा. प्रेमप्रसंगात यश. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. जीवनसाथीचा सहयोग मिळेल. शुक्रवार लाभाचा दिवस. मानसन्मान मिळेल.
उपाय-सकाळी उठल्याबरोबर थोडा मध खा. मंगळवारी मारुतीचे दर्शन घ्या.
वृषभ-
उत्साह आणि जोश तुमच्या प्रत्येक कामात दिसेल. रागाच्या भरात बोलणे महागात पडू शकते. सही करताना सावध रहा. वाहन सुख उत्तम. मनोरंजनाकडे कल राहील. नोकरदारांना कामाचा योग्य परतावा मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. भाग्याची उत्तम साथ आहे.
उपाय- पैशाची आवक वाढवण्याकरता 8 किलो उडीद प्रार्थनापूर्वक नदीत सोडा.
मिथुन-
भाग्याची साथ उत्तम आहे. प्रवासाचे योग बनत आहेत. धार्मिक स्थळाला भेट द्याल. कामाच्या ठिकाणी नव्या पद्धतीने काम कराल. सौंदर्यदृष्टीत वाढ होईल. जीवनसाथीशी वाद होण्याची शक्मयता आहे. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. वाहन जपून चालवा. मित्राच्या थापांमध्ये अडकू नका.
उपाय- भाग्यवृद्धीसाठी केळीच्या झाडाची पूजा करा. त्याला हळदीचे पाणी घाला.
कर्क-
पैशाच्या बाबतीत उत्तम काळ आहे. जुनी येणी वसूल होतील. तब्येतीची तक्रार राहील. लिखाणात यश मिळेल. सौदे पूर्ण होतील. जमीन खरेदी विक्रीत यश. प्रेमींकरता आनंदाचे दिवस. वैवाहिक जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल. भाग्यापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा.
उपाय- प्रयत्नांना यश मिळण्यासाठी नदीतील 5 गोटे आणून 1 आठवडा पूजा करावी व परत नदीत सोडावे.
सिंह-
मुळात राजासारखी वृत्ती या काळात आणखी चमकेल. जिभेवर संयम ठेवा. गरजा पूर्ण होतील. घरच्या लोकांकरता वेळ काढाल. छोटय़ा प्रवासाचे योग. पैसा सध्या कोठेही गुंतवू नका. पाठीमागे बोलणारे लोक एखादा आळ आणतील. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील.
उपाय- दुर्भाग्य नाशासाठी घरातील कचरा व कोळीष्टके काळय़ा पिशवीत भरून 4 रस्त्यावर सोडून द्यावीत.
कन्या-
तब्येतीची तक्रार दूर होईल. उत्तम स्वास्थ्य लाभ. पैशाची चणचण नाहीशी होईल. लहान भावंडांची मदत मिळेल. जमिनीचे व्यवहार टाळा. प्रेमसंबंधात यश. शत्रूंची बोलती बंद होईल. जीवनसाथीच्या व्यवहारामुळे मन उदास होईल. मित्रांची मदत ऐनवेळी मिळणार नाही.
उपाय-घरातील कलह कमी होण्यासाठी रामदरबाराचा फोटो लावावा.
तुळ-
चतुरतेने दुसऱयांकडून कामे करून घ्याल. बोलण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही. कागदपत्रे गहाळ होऊ शकतात. आईबद्दल काळजी वाटेल. पेमसंबंधात कटू प्रसंग. शत्रूंचे तोंड बंद होईल. वैवाहिक जोडीदाराबरोबर भांडण टाळा. मानसन्मानाचे योग आहेत. लाभात कमी होणार नाही.
उपाय-मनोकामना पूर्तीसाठी बेलाच्या पानावर चंदनाचा टिळा लावून शंकराला अर्पण करा.
वृश्चिक-
तब्येतीची उत्तम साथ मिळाल्याने उत्साहात कामे कराल. कुटुंबीयांची मिळावी तशी साथ मिळणार नाही. करार करताना सावध रहा. वास्तूसंबंधी व्यवहार टाळा. जोखीम असणाऱया गुंतवणुकीत नुकसान होईल. वैवाहिक जोडीदाराचा हट्ट पूर्ण करताना चिडचिड होईल. मित्रांकडून फायदा.
उपाय-उत्तम लाभाकरता मंदिरात 7 दिवस सेवा करा.
धनु-
मानसन्मानाच्या दृष्टीने भाग्यवान रास. पोटाच्या, पचनसंस्थेच्या तक्रारी होऊ शकतात. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाईल. लिखित व्यवहार करताना सावध रहा. चुका होऊ शकतात. पेमप्रसंगात फसवणूक, वैवाहिक जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. नशिबाची साथ आहे.
उपाय- गुरुवारी असोला नारळ लाल कापडात बांधून जलप्रवाहित करा.
मकर-
नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मनाप्रमाणे कामे होतील. तब्येतीला जपावे लागेल. धनप्राप्तीविषयी अकारण चिंता वाटेल. नको ते धाडस करणे टाळा. घरातील ज्ये÷ स्त्री क्यक्तीबद्दल चिंता वाटेल. शत्रंtच्या कारवायांमध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवनात मतभेदाचे प्रसंग.
उपाय-बाधा टाळण्याकरता हनुमान मंदिरातला शेंदूर रामाच्या पायावर लावावा.
कुंभ-
अचानक धनलाभाचे योग आहेत. गुप्त बातमी कळेल. वाणीवर ताबा ठेवा. प्रवास टाळा. प्रेमप्रसंगात यश. गुंतवणुकीतून फायदा. कलाकारांना उत्तम काळ आहे. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. नशिबाची साथ आहे. मानसन्मानाचे आणि कौतुकाचे योग आहेत.
उपाय- 5 वातींचा दिवा मारुतीच्या मंदिरात लावावा. कामे लवकर होतात.
मीन-
प्रॉपर्टीच्या बाबतीत उत्तम योग बनत आहेत. वैवाहिक जीवन सुखमय होईल. तब्येतीला जपावे लागेल. कामाचा ताण येईल. आर्थिक बाबतीत असमाधान वाटेल. प्रवासात मनस्ताप, गुंतवणुकीकरता काळ अनुकूल नाही. दूरच्या प्रवासासाठी बोलावणे येईल पण टाळलेले बरे.
उपाय- पूजा करताना दिव्यामध्ये 2 लवंगा घालाव्यात. अडथळे येत नाहीत.