ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आम आदमी पार्टीने विधानसभा निवडणूकीसाठी आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेक आश्वासने दिली आहेत. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपाला थेट आव्हान दिले की, भाजपाने उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत दिल्लीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करुन दाखवावा. या उमेदवाराशी आपण कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहोत. असे आवाहन दिले आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सफाई कर्मचाऱयांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा यावेळी केली.
त्याचबरोबर मुंबईतील नाईट लाईफच्या धर्तीवर दिल्लीतील विविध महत्वाच्या व्यावसायिक ठिकाणी चोवीस तास खुले असणारे प्रायोगिक तत्वावर मार्केट तयार करण्याची घोषणाही यावेळी आपच्या नेत्यांकडून करण्यात आली.
दरम्यान, दिल्लीत जाहीरनामा प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पक्षाचे इतर सदस्य उपस्थित होते.