मेक्सिको सिटी / वृत्तसंस्था
दक्षिण मेक्सिकोतील टक्स्टला गुटेरेझ शहराजवळ स्थलांतरितांना घेऊन जाणारा ट्रक दुसऱया ट्रकला धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये मध्य अमेरिकेतील 100 हून अधिक प्रवासी होते. या भीषण अपघातात 53 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रौढ स्त्री-पुरुषांसह लहान मुलेही समाविष्ट आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे.
दक्षिण मेक्सिकोत घडलेल्या दुर्घटनेत घटनास्थळीच 49 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. चियापासजवळील ब्रिजजवळ ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी जवळपास 100 स्थलांतरित लोक ट्रकमध्ये होते. हे लोक मध्य अमेरिकेतील असल्याचेही समजते. या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र मृतदेह पसरले होते. टक्स्टला गुटेरेझ शहराजवळ स्थलांतरितांना घेऊन जाणारा ट्रक दुसऱया ट्रकला धडकला. चियापास प्रांतात हा भीषण अपघात झाला.