मंगळूर/प्रतिनिधी
मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुबईहून परत आलेल्या दोन प्रवाशांकडून ३४ लाख ४६ हजार ४६४ रुपये किमतीचे सोने जप्त केले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अन्सार कायियार (वय ३४) आणि मोहम्मद मूसा मियास (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते ७०३ ग्रॅम सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करीत होते. “दुबईहून विमानाने येथे दाखल झाल्यावर साहित्य तपासणीच्या दरम्यान त्यांच्या पेटीच्या रूपात सोने सापडले.” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.