किणये : मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयाचा 47 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण अनगोळकर होते. अनंत लाड यांनी वाचनालयाच्या कार्याचा आढावा घेतला व ग्रामीण भागात वाचन संस्कृती टिकवण्यासाठी हे वाचनालय स्थापन केले असून सध्या हे नियमितपणे चालू असल्याचे सांगितले. यावेळी मच्छे येथील लेफ्टनंट नंदकुमार पाटील व देसूर येथील लेफ्टनंट तेजस रेडेकर यांचा विशेष सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात मेघा धामणेकर व अपूर्वा चौगुले यांनी पोवाडा सादर करून केली. पुस्तके, ग्रंथांमुळे माणसाला जगण्याची दिशा मिळते. सध्याच्या धावपळीच्या व इंटरनेटच्या युगात वाचनाकडे तरुणांनी वळण्याची आवश्यकता आहे, असे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले रणजित चौगुले यांनी सांगितले. बजरंग धामणेकर, परशराम चौगुले, संतोष जैनोजी, ऍड. शंकर नावगेकर, गजानन छपरे यांनी कार्यक्रम करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अमित कणकुले यांनी वाचनालयासाठी बाराशे रुपयांची पुस्तके भेट स्वरुपात दिली. सूत्रसंचालन विनायक चौगुले यांनी केले.
Previous Articleसंतिबस्तवाड प्राथ. कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
Next Article रामचंद्र मन्नोळकरांच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ
Related Posts
Add A Comment