ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. सध्या या राज्यातील राजकीय घडोमोडींनी वेग घेतला आहे. दररोज काही ना काही घडामोडींमुळे संपूर्ण देशाचं लक्ष या राज्यांच्या निवडणुकांकडे लागून राहिले आहे. दरम्यान आता मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला रविवारी मोठा झटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 60 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करताच अनेक इच्छुकांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच काही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या पुतळ्यासह कार्यालयांची जाळपोळ करत इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.