शाहूवाडी /प्रतिनिधी
मलकापूर ता. शाहूवाडी येथील आयडीबीआय बँक शाखा मलकापूरचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेची शाखा अधिकारी यांनी शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथे कोकरुड मलकापूर मार्गावर आयडीबीआय बँकेची शाखा आहे. या बँकेच्या आवारातील एटीएम मशीन शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेची फिर्याद शाखाधिकारी संग्राम सिंह शामराव देसाई यांनी पोलिसात दिली आहे. दरम्यान घटनास्थळी शाहूवाडी पोलिसांच्या पथकाने भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेचा तपास पोलिस कॉन्स्टेबल एस. बी. दाभोळकर हे करीत आहेत.