ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील महागाई कमी करण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. घरगुती खर्च 4 टक्क्यांनी कमी झाला. जीएसटीमुळे देशातील लघु आणि मध्यम उद्योग तसेच बँकांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे जीएसटी देशासाठी एक ऐतिहासिक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे.
निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला लोकसभेत सुरूवात झाली आहे. सीतारामन म्हणाल्या, सर्वसामान्यांना जे हवे आहे, ते या बजेटमध्ये मिळणार आहे. उद्योगांना चालना मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जीएसटीसारखा एकच टॅक्स आणल्यामुळे लघू आणि मध्यम उद्योगांची स्थिती सुधारली. बँकांचीही स्थिती सुधारली असून, दिवाळखोरीतून काही बँकांना बाहेर काढणे हा अर्थसंकल्पाचा हेतू आहे.
राज्य आणि केंद्र सरकार एकत्र येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणार आहे. देशातील देशातील इंस्पेक्टर राज संपविण्यात यश आले आहे. नवीन 60 लाख करदाते मिळाले आहेत.