निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या पुत्रास अटक
मिरज / प्रतिनिधी
शहरातील मिरज-पंढरपूर रस्त्यावर गादी कारखान्याच्या शेडच्या जागेच्या वादावरुन झालेल्या मारहाणीत जयंतीलाल मुलजी ठक्कर (वय 81, रा. श्रीवल्लभ निवास, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या समोर, मिरज) या वृध्दाचा मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मयुर जयंतीलाल ठक्कर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून, राहूल मोहन मोरे (रा. बापूजी साळुंखे महाविद्यालयाजवळ, गव्हाण-पाटील घराजवळ, मिरज) याला खूनाच्या गुह्याखाली अटक करण्यात आली आहे. राहूल हा निवृत्त पोलिस निरीक्षकाचा मुलगा आहे.