प्रतिनिधी / बेळगाव
गॅस वितरक व गॅस कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे कोरोना योद्धे म्हणूनच काम करत आहेत. यामुळे प्रथम त्यांना लस देणे गरजेचे आहे. त्यादृष्टिकोनातून तालुका आरोग्य विभागाने मंगळवारी रामतीर्थनगर येथे लस दिली. जवळपास 125 जणांना लस देण्यात आली. यावेळी मेगा गॅसचे संचालक अनिलकुमार, उपसंचालक कमील पाशा, लायझनिंग ऑफिसर मयूर हिरेमठ व इतर कर्मचारी उपस्थित होते.