प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर जिह्यात लॉकडाऊन असनाही मटका व्यवसायिकांनी आपले नेटवर्क चालू ठेवले आह़े यामुळे कारोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका देखील वर्तवण्यात आला आह़े विनाकारण घराबाहेर पडणाऱयावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात़ो मात्र अवैधपणे चालणाऱया मटका व्यवसायिकांवर कारवाई कधी करणार? असा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारला जात आह़े
जिह्यात वाढत्या कारोना रूग्णांच्या पार्श्वभूमिवर 8 जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होत़ा दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होत़े मात्र अशा परिस्थितीत अवैधपणे चालणाऱया मटका व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला दिसून आलेला नाह़ी लोकांकडून पैसे स्वीकारून बिनभोटपणे आकडे लावण्याचे काम सुरू आह़े अशा प्रकारामुळे कारोनाचा प्रार्दुभाव देखील होण्याची शक्यता वाढली आह़े
रत्नागिरी शहर परिसरातील काही पानटपरी व आडोशाच्या जागेवर हे मटका व्यवसाय सुरू असतात़ पोलिसांकडून याठिकाणी कारवाई देखील करण्यात येत मात्र काही दिवसांनी पून्हा हे मटका व्यवसाय सुरू केले जातात़ सुरूवातीच्या लॉकडाऊनच्या काळात मटका व्यवसाय बंद ठेवण्यात आले होत़े मात्र मे महिन्यानंतर पुन्हा हा व्यवसाय तेजीत सुरू आह़े कारोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता अवैधपणे चालणाऱया या व्यवसायावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आह़े