वार्ताहर/ रामदुर्ग
ब्राह्मण समाज रामदुर्ग तालुका व गुरु सार्वभौम भजनी मंडळाच्या सहयोगाने यावषी अधिक मासानिमित्त येथील राघवेंद्र स्वामी मठामध्ये आधुनिक जगामध्ये लागलेला कोरोनाचा प्रादुर्भाव निर्मूलनासाठी श्री धन्वंतरी होमचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभा बेंगळूरचे उपाध्यक्ष हणमंत कोटबागी उपस्थित होते. हणमंत कोटबागी व जि. पं. सदस्य रमेश देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी हणमंत कोटबागी यांनी ब्राह्मण समाज रामदुर्ग शाखा व गुरु सार्वभौम भजनी मंडळास 50 हजार रुपये देणगी दिली. धन्वंतरी होमाचे नेतृत्व वे. मू. उल्हास गोडबोले, वे. मू. महादेव गोडबोले, वे. मू. प्रल्हादाचार्य जोशी, पंडित हेमंत गुडी, रामभट दोडवाड, गोपाल गोडखिंडी व वामन इनामदार या ब्रह्मवृंदाकडून धार्मिक कार्यक्रम झाले.
याप्रसंगी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी (बशीडोणी), प्रसाद पुराणिक, भूषण दाते, वेंकटेश पाटील, गोपाल बिंदगी आदींसह समाजबांधव उपस्थित होते.