बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी गठीत करण्यात आलेली एक उच्चस्तरीय समिती आपला अहवाल दोन दिवसांत सरकारला सादर करणार होती. उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ.सी.एन. अश्वथनारायण यांनी ही माहिती दिली. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात (व्हीटीयू) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० या विषयावरील वेबिनारमध्ये बोलताना, निवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी एस. व्ही. रंगनाथ यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने प्राथमिक शिफारसी द्याव्यात असे ते म्हणाले. दम्यान शनिवारी अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अश्वथनारायण यांनी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने राबविण्याची तयारी सुरू आहे. विद्यापीठांमध्ये ६ संशोधन केंद्रे सुरू केली जातील. याशिवाय ३४ शिक्षण संस्था स्वायत्त शिक्षण संस्थांमध्ये रुपांतरित होत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे खेळ, कला संगीत आणि इतर कलागुणांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे ते म्हणाले.
या वेबिनारचे उद्घाटन करण्यापूर्वी राज्यपाल वजुभाई यांनी समाजातील प्रत्येक स्तराला दर्जेदार शिक्षण देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट हे केवळ रोजगार मिळवणे हे नाही. म्हणून काळाच्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणून विद्यार्थ्यांनी घेतलेले ज्ञान समाजासाठी वापरावे असे त्यांनी म्हंटले.