बेंगळूर /प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. शासनाने मंगळवारी झालेल्या बैठकीत विकेंड नाईट कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान खाजगी रुग्णालये आणि नर्सिंग होम असोसिएशनने (फना) म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड उपलब्ध होत नाहीत आणि ऑक्सिजनचा कमी पुरवठा होत असल्यामुळे बेंगळूरमधील खासगी रुग्णालये देखील कमतरतेचा सामना करीत आहेत.
कोविड -१९ लस बाजारात आल्यानंतर, देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केल्याने भारतीय परिचारिकांसाठी मध्य-पूर्वेकडून ऑफर येऊ लागल्या. बेंगळूर रुग्णालयात काम करणाऱ्या बर्याच परिचारिकांनी या ऑफर स्वीकारल्या आणि ऑक्टोबरपासून काम सोडण्यास सुरवात केली. आयसीयूमध्ये कोविड -१९ प्रत्येक रूग्णाला एक नर्सची गरज लक्षात घेता त्यांची कमतरता जाणवत आहे.