बेळगाव : 2019- 20 सालाचे उत्कृष्ट रोटेरियन म्हणुन रो शरद पै यांना अलीकडेच सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो जीवन खटाव यांनी त्यांचा सन्मान केला. रोटरी क्लब ची उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या रोटरी सदस्याला दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या वर्षी शरद पै यांनी विविध उपक्रम राबवून रोटरी क्लबला उच्च स्तरावर नेले आहे त्यांनी एकस या उद्योगाच्या सहकार्याने सुमारे दीड कोटी रुपये खर्चून 25 हून अधिक शाळांमध्ये टॉयलेट बांधणे, बेंच बसवणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वॉश स्टेशन उभारणे यासारखी कामे केली. त्याचबरोबर वेगा हेलमेट्सच्या सहकार्याने सुमारे 75 लाख रुपये खर्चून वरील प्रमाणे कामे 10 शाळांमध्ये केली याशिवाय पॉलीहायड्रॉन, अशोक आयर्न व इतर उद्योजकांचे मदतीने बीम्स हॉस्पिटल यांना व्हेंटिलेटर व रोग तपासणी मशीन बसविल्या
याचबरोबर शरद पै रोटरी क्लबच्या अन्नोत्सव, पूरग्रस्त सहाय्य, कोविड पुनर्वसन यासारख्या कार्यात नेहमी सहभागी असतात. गेल्या तीस वर्षापासून ते रोटरी क्लबशी संलग्न असून 2014 -15 ला अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.अविनाश पोतदार व इतरांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी त्या सर्वांचे आभार मानले आहेत या पुरस्कार वितरण प्रसंगी रोटरीचे जीवन खटाव, प्रमोद अग्रवाल, डॉक्टर केळूसकर, गणेश देशपांडे ,वीरधवल उपाध्ये, डॉक्टर मनोज सुतार आदी सदस्य उपस्थित होते.
Trending
- कोरोचीत जलस्वराज ऑडिट मागणी वरून साखळी उपोषणाला सुरू
- शाळांचे नाव बदलण्यासंदर्भात संभ्रम; आदेशात महापुरूषांची नाव असलेल्या शाळांसंदर्भात स्पष्टता नाही
- अफवांवर विश्वास नको, पैशाची मागणी केल्यास तक्रार करा! जि.प.पद भरतीबाबत सीईओ संतोष पाटील यांचे आवाहन
- सातवे परिसरात बिबट्याची दहशत! रेडकाचा पाडला फडशा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
- Kolhapur : टाकवडे येथे सात लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल
- शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ लाभार्थीबरोबर इतरांनी सुध्दा घ्यावा- आमदार प्रकाश आबीटकर
- Satara Breaking : तलावात युवक-युवतीची आत्महत्या! दिव्यनगरी कोंडवे रस्त्यावरील घटना
- Satara : सातारामधील तनुश्री भोसले भारतीय रग्बी संघात